पुन्हा एका कारखान्याच्या आवारात आग; मोठी दुर्घटना टळली !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या आवारात काल दुपारी गोडाऊनच्या पश्चिम बाजुला असलेल्या वाळलेल्या गवताला आग लागली, परंतु सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

कारखाना व्यवस्थापनाने वेळीच प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. गणेश कारखान्याच्या पश्चिम बाजुला कारखान्याच्या आवारात साखर गोडावूनच्या शेजारी असलेल्या वाळलेल्या गवताला काल दुपारी 2.30 च्या सुमारास आग लागली.

गवत वाळलेले असल्याने काही वेळेतच आगीने उग्ररुप धारण केले. त्यामुळे आग झपाट्याने पसरली. कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ यंत्रणेला सतर्क करुन अग्निशमन यंत्रणेस पाचारण केले.

शिर्डी येथील साईबाबा संस्थान, शिर्डी नगर पालिका, राहाता नगर पालिका, तसेच विखे कारखान्याच्या अग्निशमन गाड्या काही वेळेतच दाखल झाल्या. आगीने उग्ररुप धारण केल्याने मोठा धूर परिसरात दिसू लागल्याने काहीकाळ काळजीचे वातावरण दिसून येत होते.

वाळलेल्या गवतात काही लाकडे पडलेली होती. त्याबरोबर ऊस वाहण्यासाठी असणार्‍या कालबाह्य झालेल्या 10-12 टायर गाड्या आदी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

आगीचे लोण साखर गोडाऊनच्या भिंतीपासुन काही अंतरावर होते. आग विझवण्यात यंत्रणेला यश आले. अन्यथा गोडाऊनमध्ये असलेल्या साखरेचे उष्णतेने पाणी झाले असते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment