वीजबिल मुद्यावरून महसूलमंत्र्यांकडून ऊर्जामंत्र्यांची पाठराखण

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-सध्या राज्यात वाढीव वीजबिल मुद्दा चांगलाच तापला आहे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांना आलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

या मुद्यवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. अशातच एक धक्कादायक खुलासा कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती.

प्रक्रिया फोलो करणे आवश्यक होते. तसे झाले नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून कॉंग्रेसमधील नेते आमनेसामने आले आहेत. राऊत यांनी घाई केली असे चव्हाण सांगत असताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे नितीन राऊत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे चित्र आहे.

नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ही मंत्रिमंडळ सहकारी समवेत चर्चा करूनच केली होती, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

वीजबिल संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्रिमंडळातील सहकारी चर्चा करूनच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घोषणा केली होती. याबाबत कदाचित अशोक चव्हाण यांना माहिती नसावी, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment