‘या’ कारणांमुळे बातमी देताना लपवावी लागते कोरोनाग्रस्तांचे नाव व इतर माहिती…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून निघालेल्या या व्हायरसने जगास जेरीस आणले आहे. भारतातही याचे संक्रमण वाढतच चालले आहे.

महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. परंतु तुम्हाला माहित का ? कि कोरोनाचे वृत्तांकन करताना ज्या व्यक्तीला कोरोना झाला आहे त्याची ओळख लपवावी लागते. त्याचे नाव इतर माहिती उघड करता येत नाही. 

जाणून घेऊयात यामागे काय आहे खरे कारण. कोरोना झालेल्या व्यक्तीचे नाव उघड केल्यास बऱ्याचदा असे आढळून आले आहे की त्या व्यक्तीकडे बघण्याचाच समाजाचा दृष्टिकोन बदलतो.

त्याच्यावर बहिष्कार घातला जातो. त्याच्या व्यवसायावर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाईट परिणाम होतो. बऱ्याच ठिकाणी असे आढळून आले आहे की या व्यक्तींचे नाव उघड केल्याने त्यांना समाजाने बहिष्कृतही केले आहे.

यासाठी प्रशासनाने या व्यक्तींना अशी वागणूक मिळू नये व त्यांची बदनामी होऊ नये यासाठी नियम जारी केला आहे की कोरोनाचे वृत्तांकन करताना ज्या व्यक्तीला कोरोना झाला आहे त्याची ओळख संपूर्णतः लपवावी लागते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment