मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता विविध मागण्यांसाठी जागरण गोंधळ !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता विविध मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने सोमवार दि.17 ऑगस्ट रोजी शहरातील चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांना त्वरीत हटविण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात छावाचे प्रदेश संघटक विश्‍वनाथ वाघ, अशोक चव्हाण, गणेश येवले, राजाराम शिंदे, जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, श्रीहरी लांडे, राहुल कांगुणे, विठ्ठल ठोंबरे, बबनराव वाघुले, राम काळे, संजय चौधरी, निखिल वाघुले, संदीप वरखडे, विठ्ठल ठोंबरे, प्रदीप औटी आदि सहभागी झाले होते. आंदोलनासाठी चौथे शिवाजी महाराज स्मारक स्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमल्याने पोलीसांनी हस्तक्षेप करुन कार्यकर्त्यांना पांगवले. संबळ, डफच्या निनादात झालेल्या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली.

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संयमाने आंदोलन व पाठपुरावा चालू आहे. परंतु सरकार आणि प्रशासन या मागणीकडे लक्ष देत नसेल तर संयमाचा बांध संपत चालला असून, तीव्र स्वरुपात आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. मराठा आरक्षण चळवळीतील हुतात्मा झालेल्या शूरवीरांना 10 लाख रुपये व नोकरीत सामावून घेण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तसेच सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसेल तर सरकारने सत्तेतून बाजूला होण्याची घोषणा करण्यात आली.

महाविकास आघाडी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना.अशोक चव्हाण यांचे मराठा आरक्षणकडे दुर्लक्ष होत असून, त्यांना समितीपासून दूर करून मराठा समाजाच्या प्रश्‍नांची जाण असलेल्या मंत्र्यांकडे जबाबदारी सोपविण्यात यावी, मराठा समाज आरक्षण व इतर मागण्यांसाठी दोन दिवसीय विधिमंडळाचे अधिवेशन घ्यावे, सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी न घेता ती कोर्ट पूर्णपणे सुरू होईल तेव्हा समोरासमोर व्हावी असा आग्रह महाराष्ट्र शासनाने धरावा, मराठा आरक्षण घटनेप्रमाणे दिले असल्यामुळे

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ याकडे चालण्यासाठी वर्ग करावे म्हणून सरकारने विनंती अर्ज करावा, 50 टक्केपेक्षा अधिक आरक्षण दिलेल्या सर्व याचिका एकत्रित चालवाव्यात व त्यात मराठा आरक्षण याचिकेचा समावेश करावा, मराठा आरक्षणबाबत उच्च न्यायालयात ज्या वकीलांनी काम केले त्यांना सर्वोच्च न्यायालयात सुनावणी मध्ये सहभागी करावे, मराठा आरक्षण, समाजाचे इतर महत्त्वाचे विषयांना ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे ठेवू नये ते दुसर्‍या मंत्रीमहोदयांकडे द्यावे, मराठा समाज्याच्या प्रश्‍नाबाबत ज्यांना चांगली जाण आहे

अशा महत्त्वाच्या मंडळी सोबत बैठक घेऊन आरक्षण सद्यपरिस्थिती बाबत माहिती द्यावी व सूचना ऐकून घ्याव्या, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 5 हजार कोटींचे निधी कर्जवाटप साठी उपलब्ध करून द्यावा, मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बांधकामवरील सुप्रीम कोर्टाची स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मराठा विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना त्वरित सुरू करावी,

मराठा आरक्षण 20-15 मध्ये एस.ई.बी.सी. मध्ये नोकरीसाठी ज्यांनी मुलाखत दिली, परीक्षा दिली, निकाल लागला नोकरीचे आदेश मिळाले पण अशा सर्वांना शासन रुजू करून घ्यावे, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांसाठी 10 टक्के आरक्षण फक्त मराठा समाजाला लाभ घेता येणार नाही हा 28 जुलै 2020 चा निर्णय रद्द करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन तोफखाना पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस उपनिरीक्षक किरण सुरसे यांना देण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment