परदेशी कांदा ग्राहकांना ६०रुपये किलो दराने मिळणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी परदेशातून २५ हजार मेट्रिक टन कांदा आयातीची घोषणा केली.

७ हजार टन कांदा खासगी आयातदार तर उर्वरित नाफेडच्या माध्यमातून आयात होणार आहे. याबाबत बुधवारी नाफेडने ऑनलाइन लिलाव प्रक्रिया अवघ्या १० मिनिटांत आटोपती घेतली.

हा आयातीत कांदा नाफेड ५० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे त्याची वाहतूक मुंबई बंदरापर्यंतच असेल. त्यानंतरचा वाहतूक खर्च हा पुन्हा नाफेडला करावा लागणार आहे.

आयात केलेला हा कांदा ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो दराने देशातील ग्राहकांच्या हाती पडणार आहे. नाशिक जिल्ह्यामधील लासलगाव,

पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ आणि लाल असा दोन्हीही कांदा येत असल्याने दरात घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या किमान कांदा दर ३५ रुपये तर कमाल ५० रुपये आणि सरासरी चाळीस रुपये किलो सुरू आहे.

अशी परिस्थिती असतानाही केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून परदेशी कांदा ५० रुपये किलो दराने कांदा खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांत संतापाची भावना आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment