अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा बळी गेला असताना, गुरुवारी (दि.5 नोव्हेंबर) पहाटे नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.
या बिबट्याला पकडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार्या वन विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांचा जय भगवान महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता.
बिबट्याला सावरगाव हद्दीत सटवाई दर्यावरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजर्यात जेरबंद करण्यात आले आहे.जय भगवान महासंघाच्या पदाधिकार्यांनी वन विभागात जाऊन अधिकारी व कर्मचारींच्या कार्याचे कौतुक करुन सत्कार केले.
यावेळी जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे, जिल्हा संपर्क प्रमुख डॉ.श्रीकांत चेमटे, जिल्हाध्यक्ष रमेश सानप, बंटी ढापसे, कैलास गर्जे, आकाश खर्पे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved