अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकट काळातही राजकीय कुरघूड्या सुरूच आहे. ‘राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेचे घेणेदेणे नाही.
राज्य सरकारने कुठलीही जनतेला मदत केली नाही, असे चित्र महाराष्ट्रात पाहण्यास मिळत आहे. अशी कडवी टीका जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केली.
दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगरमध्ये शहर भाजपच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिंदे उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. केंद्र सरकारने मोफत उपलब्ध करून दिलेले अन्नधान्य गरिबांपर्यंत पोहचावे याबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही.
उलट अन्नधान्याचे मोठे घोटाळे झाले. अशा शब्दात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. सध्या देशात कृषी विधेयक चांगलेच गाजते आहे.
याच कृषी विधेयकाला विरोध म्हणून विरोधी पक्षांनी आज मोदी सरकाच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. याच बाबत प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले कि, अनेकजण विधेयक नीट वाचत देखील नाहीत.
त्यांनी ती व्यवस्थित वाचली आणि समजून घेतली तर त्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे दिसून येईन. मात्र ते न वाचताच आंदोलने करणारेच खरे शेतकरी विरोधी आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved