अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्यात माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालीही भाजपने आक्रमक आंदोलन करून दूध दरवाढ करून शेतकर्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा अशी मागणी केली.
दूधाची खरेदी अतिशय कमी दराने होते, त्याचवेळी विक्री 50 ते 60 रुपयाने होते. याबाबत सरकारला अर्ज विनंत्या करूनही निर्णय घेतला नाही. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.
शेतकरी रस्त्यावर आला आहे, वीज बिल अवाजवी देण्यात आली आहेत. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकर्याला मदत करायला तयार नाही. हे सरकार तिघाडी सरकार असून एका नवर्याच्या दोन बायका अशी अवस्था आहे.
सरकार कधी कोसळेल याचा पत्ता लागणार नाही. गेल्या सात आठ महिन्यात एकही जनहिताचा निर्णय सरकारने घेतलेला नसून शेतकर्यांच्या दूधाला चांगला भाव देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी यावेळी प्रा.शिंदे यांनी केली.
-
-
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा