अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.
अहमदनगर शहरातील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. हजारो चाहते, समर्थकांनी गर्दी करत लाडक्या भैय्या यांना अखेरचा निरोप दिला.
राठोड यांच्या अंत्ययात्रेला नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. अंत्यसंस्कारानंतर स्थानिक नेत्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना श्रध्दांजली वाहताना अश्रूृ अनावर झाले होते.
शिवसैनिकांनी जागोजागी रस्त्यावर गर्दी केली होती. अनिल भैय्या अमर रहे… अशी घोषणाबाजी शिवसैनिक करीत होते. अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
हॉस्पिटलमधून निघालेल्या अॅम्ब्युलन्ससमोर दुचाकी रॅली होती. सर्जेपुरा, चितळे रोड, दिल्लीगेटमार्गे अमरधाममध्ये भैय्यांचे पार्थिव पोहोचले.
हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले राठोड हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय होते. युती सरकारच्या काळात राज्यमंत्री पदाची जबाबदारीही त्यांना सांभाळली होती.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved