अहमदनगर ब्रेकिंग : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन !

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीत खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

गांधी यांनी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली असता कोरोनाचे निदान झाले होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे आज पहाटे तीनच्या सुमारास दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झालं.

काल त्यांचा कोरना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना श्वास घेण्यास जास्त त्रास होत असल्याने काल दुपारपासूनच त्यांना दिल्लीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

मात्र उपचार सुरू असताना आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळेस भारतीय जनता पार्टी कडून खासदार म्हणून निवडून आले होते. तर 2003 ते 2004 दरम्यान केंद्रातील भाजप सरकार मध्ये जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला.

1999 ते प्रथम खासदार झाले, पुढे 2009 आणि 2004 सारी ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले होते. 2019 ला त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारून सुजय विखे यांना उमेदवारी दिली, मात्र दिलीप गांधी यांनी नाराजी व्यक्त न करता पक्षाचं काम अविरत केलं.

स्वर्गीय दिलीप गांधी हे संघाच्या मुशीत वाढले होते. भारतीय जनता पक्षाच्या विविध शाखात त्यांनी काम केलं. नगरपालिकेचे नगरसेवक, उपनगराध्यक्षपद, नगर अर्बन बँकेचे अध्यक्षपद आदी पदे त्यांनी भूषविली होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
  • #Former Union Minister Dilip Gandhi dies
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe