अहमदनगर जिल्ह्यातील चौघांचा भीषण अपघातात मृत्यू !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- मुंबईवरून पारनेरकडे परतत असताना मालवाहू छोटा हत्ती वाहनास आयशर टेम्पोने समोरासमोर दिलेल्या धडकेमध्ये पारनेर तालुक्यातील करंदी येथील चौघे जागीच ठार झाले.

जुन्नर तालुक्यातील वडगांव आनंद शिवारात पहाटे सव्वापास वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

करंदी येथील हे तरूण परिसरातील भाजीपाला खरेदी करून तो मुंबई येथे विक्रीस नेत होते. गुरूवारी सायंकाळी हे तरूण छोटा हत्ती (क्र. एम एच १६ सी सी ६३८८) या मालवाहून वाहनातून भाजीपाला घेउन मुंबईकडे रवाना झाले.

तेथे भाजीपाला विक्री करून छोटा हत्ती या वाहनातून परतत असताना वडगांव आनंद, ता. जुन्नर जि. पुणे शिवारात समोरून येणा-या आयशर या टेम्पोने (क्र. एम. एच १६ ए ई ९०८०) तरूण प्रवास करीत असलेल्या वाहनास जोराची धडक दिली.

ही धडक इतकी भिषण होती की त्यात छोटा हत्तीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला व त्यात वाहनातील चौघाही तरूणांनाचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये सुरेश नारायण करंदीकर वय (४४), सिद्धार्थ राजेश उघडे (वय २२), आकाश सुरेश रोकडे (वय २६), सुनिल विलास उघडे (वय १९) यांचा समावेश आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe