मुंबईत गरजली कंगना; शिवसेनेवर केली टीका

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत आल्याचे आपण पहिले असेलच. आता तिने मुंबईत येऊन देवदर्शन घेतले आहे . कंगनाने मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायकाचे दर्शन भेटले आहे.

कंगनाचा लूक यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तिने मराठमोळा लूक केला होता. कंगनाने पारंपरिक साडी वेगळ्या पद्धतीने नेसली होती. तिने हिरव्या रंगाची पैठणी साडी परिधान केली होती.

मंदिर व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार कंगनाने मंगळवारी सकाळी १० वाजता सिद्धिविनायक मंदिरात येऊन णपती बाप्पाचे दर्शन भेटले. कंगनाने दर्शन घेतल्यानंतर मीडियाशी पण संवाद साधला.

कंगनाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने शिवसेनेला टोला पण लगावला आहे. कंगनाने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणते की, “मुंबईत येण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही.

मला फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज आहे.”मागे कंगनाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठं वादळ उठल होत.कंगनाच्या विधानानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी तसेच बॉलिवूडमधील लोकांनी तिच्यावर टीकेची राळ उठवली होती.

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगना आणि महानगरपालिका यांच्यातील वादही चांगलाच गाजला होता.