श्रीगोंदे :- भाजपला पाच वर्षांत स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाहीत, ते विकासावर काय बोलणार?
सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरवूनही ते भाजपमध्ये का गेले?

असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते. विखे घराण्याला सर्व पक्षांची चाचपणी करण्याचा इतिहास आहे, असा टोलाही भुजबळ यांनी लावला.
चूक नसताना मला जेलमध्ये टाकले. मुख्यमंत्री म्हणतात, भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात.
मी आमदार, महापौर असताना आपण हाफचड्डीवर शाळेत जात होता. मग तुम्हाला विचारून भाषण करू का?
आ. जगताप यांनी श्रीगोंद्याच्या भूमिपुत्राला संधी देण्याचे आवाहन केले. राहुल जगताप म्हणाले, ‘भाजप सरकारने शेतकऱ्यांची सर्वात मोठी फसवणूक केली आहे.
शेतीमालाला हमीभाव देतो, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, असे त्यांनी जाहीर केले परंतु कर्जमाफी दिली नाही आणि हमीभावही दिला नाही. यामुळे देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
राजेंद्र नागवडे म्हणाले, मोदींनी १५ लाख देण्याची खोटी घोषणा केली.
देशाच्या सुरक्षेचे राजकारण भाजपने केले. अशा सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे.
घनश्याम शेलार म्हणाले, सुजय विखे दमबाजीची भाषा करतात. आजोबांसारखीच परिस्थिती त्यांचीही होईल.
- बाबा वेंगा यांच सोन्याच्या किमतींबाबत मोठ भाकित ! 2026 मध्ये एक तोळा सोन खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ 5 नियमात होणार मोठा बदल, मिळणार मोठे आर्थिक लाभ
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरातुन चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण !
- दसरा ते दिवाळीच्या काळात ‘या’ शेअर्समधून मिळालेत जबरदस्त रिटर्न ! 65 टक्के रिटर्न देणारे शेअर्स कोणते आहेत?