गरिबांना दरमहा सहा हजार रुपये द्या : सत्यजित तांबे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. केंद्र सरकारने पॅकेजची घोषणा केली, परंतु याचा लाभ किती व कधी मिळणार हा प्रश्न आहे.

म्हणून राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील न्याय या योजनेंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना दरमहा सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर किमान पुढील सहा महिने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी शिवाजीनगर येथे युवक काँग्रेसच्या वतीने न्याय योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना २०० रुपये प्रतिदिनाचे प्रतीकात्मक वाटप तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, नगरसेवक नितीन अभंग, गौरव डोंगरे, विजय उदावंत, विशाल वालझाडे, मुश्ताक शेख आदी यावेळी उपस्थित होते.

तांबे म्हणाले, खासदार राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १ लाख ४४ हजारपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व कुटुंबांना दरमहा ६ हजार रुपये बँकखात्यात जमा करण्याची योजना आणली होती.

लॉकडाऊनमुळे कामे बंद आहेत. गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने पॅकेजच्या घोषणा केल्या, त्यांचा लाभ गरिबांना कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकारने महिना ६ हजार रुपये किमान पुढील सहा महिने तरी द्यावेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment