सोने 1300 रुपयांनी झाले स्वस्त ; वाचा …

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- शेअर बाजाराच्या तेजीच्या तुलनेत काल सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात काल सोन्याचा भाव 614 रुपये इतका कमी नोंदविला गेला आणि तो दहा ग्रॅम पातळीवर 49763 रुपयांवर बंद झाला.

गुरुवारी सोन्याच्या किंमतीतील घसरणीची नोंद झाली. गुरुवारी सोने 714 रुपयांनी स्वस्त झाले. गुरुवारी त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 50,335 रुपये होती. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 51,049 रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच मागील दोन दिवसात सोने 1300 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सराफा बाजारात चांदीच्या दरातही 1609 रुपयांची जोरदार घसरण नोंदवली गेली. चांदीचा भाव आज 67518 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. गुरुवारी चांदीच्या भावातही 386 रुपयांची घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, डॉलरच्या वाढीमुळे सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या आहेत.

गोल्ड डिलिवरीमध्ये घसरण – सराफा बाजारातील घसरणीत आज एमसीएक्स डिलिव्हरीवरील सोन्याचे भावही घसरताना दिसून आले. सायंकाळी 6.10 वाजता, फेब्रुवारी डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 732 रुपयांनी घसरून 50172 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. त्याचप्रमाणे एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 734 रुपयांनी घसरून 50206 रुपयांवर आणि जूनच्या डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 555 रुपयांनी घसरून 50421 रुपयांवर बंद झाला.

इंटरनेशनल मार्केट रेट – आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्यावर खूप दबाव दिसून आला. इन्व्हेस्टिंग डॉट कॉमवर फेब्रुवारी महिन्यातील सोन्याचा भाव 25.70 डॉलरने घसरून प्रति औंस 1887.90 डॉलरवर होता. यावेळी, मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा दर 0.63 डॉलरने घसरून 26.63 डॉलर प्रति आउंसवर ट्रेंड करत होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe