अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : जिल्हयातील शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकेमार्फत मोठया प्रमाणावर पिक कर्ज वाटप होत असुन बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या पिक कर्जासाठी रूपये १ लाखापर्यंत पिक कर्जासाठी रूपये ० टक्के तर रूपये १ लाखाचे पुढे ते रूपये ३ लाखापर्यतच्या पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना रुपये २ टक्के व्याज भरावे लागत होते. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या व्याज परताव्यामुळे है व्याज लागत होते.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जदार शेतकरी सभासदांना रूपये १ लाखापुढे ते ३ लाखापर्यंतच्या पिक कर्जासाठी शेतकरी सभासदांना रूपये २ टक्के भरावयाचे व्याज अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बँकेच्या स्वनिधीतुन भरणार असल्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला असल्याची माहीती बँकेचे चेअरमन श्री.सिताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन श्री.रामदास वाघ, ज्येष्ट संचालक व माजी मंत्री श्री.शिवाजीराव कर्डीले व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रावसाहेब वर्षे यांनी दिली.
बँकेच्या या निर्णयामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या रूपये ३ लाखाच्या पिक कर्जासाठी ० टक्के व्याजदर लागणार असल्याने अडचणीत असणाऱ्या जिल्हयातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात दिलासा मिळणार असल्याची माहीती चेअरमन श्री.सिताराम पाटील गायकर यांनी देवुन पुढे सांगीतले की, बँकेच्या याच निर्णयाबरोबर भोगवटादार नं.२ जमीन धारणा प्रकरणातील अनेक शेतकरी सभासद असल्याने व त्यांनी वारंवार पिक कर्जाची मागणी बँकेकडे केली आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे बँक या शेतकरी सभासदांना कर्ज पुरवठा करू शकत नव्हती.
चालु वर्षी पाऊस चांगला आहे. परंतु कोविड-१९ च्या संकटामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला असल्याने अशा जिल्हयातील भोगवटादार नं.२ जमीन धारणा प्रकरणातील सभासदांनाही कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतला असल्याची माहीती चेअरमन श्री.सिताराम पाटील गायकर यांनी दिली. भोगवटादार नं.२ जमीन धारणा प्रकरणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बँक शासनाकडे पाठपुरावा करीत असुन शासनाकडून सकारात्मक निर्णय होणार असल्याचेही चेअरमन श्री.सिताराम पाटील गायकर यांनी मत व्यक्त केले.
बँकेने चालु खरीप हंगामात १ लाख ७० हजार शेतकरी सभासदांना रूपये १००१ कोटीचे पिक कर्ज वाटप केले असुन बँकेस खरीप हंगामासाठी रूपये १४९८ कोटीचे व रब्बी हंगामासाठी रूपये ८०९ कोटीचे असे एकूण रूपये २३०७ कोटीचे पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले असुन हे उद्दीष्ट बैंक वेळेत पुर्ण करणार असल्याची माहीती देवुन बँकेचे चेअरमन श्री.सिताराम पाटील गायकर म्हणाले की,
बँकेने नेहमीच जिल्हयातील शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतलेले असुन बँकेने नुकतेच संयुक्त उतारा असलेले शेतकरी सभासद, पिक कर्ज सोडून मध्यम व दिर्घमुदतीचे इतर बँकेकडून कर्ज घेणारे कर्जदार शेतकरी सभासद, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मात्र शासनाकडून कर्जमाफीची रक्कम प्राप्त न झालेल्या शेतकरी सभासदांसाठी पिक कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय यापुर्वीचा जिल्हा बँकेने घेतलेला असल्याने बँकेमार्फत मोठया प्रमाणात पिक कर्ज वाटप होत असल्याची माहीतीही श्री.सिताराम पाटील गायकर यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews