अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- सर्वसामान्य लोकांसाठी मुंबई लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न लाखो मुंबईकरांना पडला आहे. मात्र नुकतेच मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
मुंबईतील लोकल सेवा 01 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. गर्दीच्या वेळा टाळून इतर सर्वांसाठी लोकल प्रवास करता येणार आहे. कोरोनाने राज्यासह देशभरात कहर माजवण्यास सुरुवात केल्यानंतर टाळेबंदीसह सार्वजनिक वाहुतक सेवा बंद करण्यात आली होती.
यानंतर, अनलॉक लागू करण्यात आला व सार्वजनिक वाहतूक देखील सुरु करण्यात आली.
मात्र, मुंबईतील लोकलसेवा मात्र बंदच ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन आढावा देखील घेतला होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली होती.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved