अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद करण्यात आली होती.
मात्र यादरम्यान कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेले राज्य सरकारने अनेक दिवसांनंतर दारूची दुकाने खुली केली होती. दरम्यान पुन्हा एकदा राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
यामुळे तळीरामांमध्ये आनंदाचे वातावरण पसरणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार 2016 पासून विविध निर्बंधांमुळे बंद असलेली मद्याची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत: पर्यटन स्थळे आणि महामार्गांलगत असणाऱ्या मद्याच्या दुकानांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 2016 साली लागू केलेल्या अंतर निर्बंधांमुळे राज्यातील तब्बल 2200 मद्याची दुकाने बंद झाली होती. नंतरच्या काळात न्यायालयाने यासंदर्भातील नियम काहीसे शिथील केले. त्यामुळे यापैकी काही दुकाने सुरु झाली होती. मात्र, आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे उर्वरित 2200 पैकी 1500 दुकाने सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या भागातील दारूची दुकाने सुरु होणार:-
- या नियमावलीनुसार पर्यटन स्थळे, एमएमआरडी, पीएमआरडीएसारखी क्षेत्रातील बंद असलेली दारू दुकाने सुरू करण्याची परवानगी
- महापालिका हद्दीपासून 5 किलोमीटरच्या आत असलेली दुकाने
- तर नगरपालिका हद्दीपासून 3 किलोमीटरच्या आत असलेली दुकाने
- दीड हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील मद्याची दुकानेही आता सुरु होतील.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved