अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- शेतकऱ्यांना आर्थिक सोर्स मिळून उभा करून देण्यासाठी कांदा या पिकाची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. अनेकदा आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कांद्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावलेला आहे.
आता या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कांदा साठवणीसाठी कांदा चाळ महत्वाची असते. या चाळीच्या उभारणीसाठी राज्यसरकारने ६० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.
यानुसार शेतकऱ्यांना चाळ उभारणीसाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. सदर प्रकल्पाांतर्गत एकूण रू. १५० कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत
अर्थसहाय्याच्या स्वरुपात ६० कोटी रुपयांचा निधी एका वर्षाच्या कालावधीसाठी मंजुर करण्यात अला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उभारण्यात येणार्या कांदा चाळ योजनेसाठी
राज्यासाठी ६० कोटी रकमेच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा व्यवस्थित राहून त्याची टिकवण क्षमता काही प्रमाणात वाढवण्यासाठी कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून पडताळणी करून नंतर अनुदानाची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
अशी आहे प्रक्रिया :- विभागाच्या हॉर्टनेट प्रणालीद्वारे शेतकर्यांचे अर्ज ऑनलाईन मागवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांचीसोडत पध्दतीने निवड कर्यात येणार आहे.
लाभार्थ्यांच्या कांदा चाळीची उभारणी केल्यानंतर त्याबाबतच्या नोंदी जिओ-टॅगींगद्वारे करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या सातबारा उतार्यावर नोंद केल्यानंतर अनुदान अदा केले जाणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved