अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यांना हरियाणाच्या सीमेवर अडवून त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला आहे.
सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, कृषी कायद्यांचा एक विषय आहे, इतरही मागण्या आहेत, त्याचा केंद्र सरकारनं विचार करण्याची गरज आहे. तो जो काही कृषी कायदा केलेला आहे.
तो कोणालातरी फायदा व्हावा या हेतूने केलेला आहे. शेकऱ्यांना काय शहरातील नागरिकांना देखील त्रासदायक ठरवणारा हा कायदा आहे.
देशातील फक्त पंजाब आणि हरियाणा नाही तर देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारनं सहानुभूतिपूर्वक विचार करावा.
आज देशातील राज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved