महाशिवआघाडीचे स्वप्न धूसर !

Published on -

मुंबई :- राज्यात महाशिवआघाडीचे स्वप्न धूसर झाले आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी दिलेली मुदत संपली असून आता पुढे काय हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्रापुढे आहे.

महाराष्ट्रावर सद्य:परिस्थितीत राष्ट्रपती राजवटीचे सावट आहे, यात कोणाचेही दुमत नाही. तरीही शिवसेनेला अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र येईल आणि आपण सत्ता स्थापनेचा दावा करू अशी आशा आहे.

शिवसेनेने राज्यपाला सत्ता स्थापनेसाठी आणखी वेळ वाढवून मागितली, परंतु राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिला.

तरीही राजभवनाबाहेर पत्रकार परिषदे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दोन्ही पक्षांना सोबत घेऊन आम्ही पुन्हा येऊ आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, असे पत्रकारांना सांगितले आहे.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!