अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
तर भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतींपैकी ५ हजार ७८१ ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामपंचायत निवडणुकांत अव्वल ठरली असून, त्याखालोखाल भाजपा २ हजार ९४२, शिवसेना २ हजार ४०६ तर काँग्रेस चौथ्या स्थानी म्हणजे १ हजार ९३८ जागांवर यशस्वी ठरल्याचे जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळातील पक्ष असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळे पक्ष पुढे आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचा दावा आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपा महाराष्ट्रात २० टक्केही नाही, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved