अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- चार वर्षापासुन कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळल्याने पाथर्डी – नगर रोडवर अनेक अपघात झाले. यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले.
महामार्गाचे काम लवकर मार्गी लागावे म्हणुन अनेक आंदोलने केली. पण लोकप्रतिनिधी म्हणून आजी माजी खासदारांच्या दुर्लक्षामुळेच या महामार्गाची वाट लागली आहे.
रस्त्याच्या कामाबाबत आपण या भागाच्या खासदारांना जाब विचारणार असल्याचा इशारा क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे संस्थापक अॅड. सतीश पालवे यांनी दिला आहे .
नगर पाथर्डी रस्त्यावर प्रचंड मोठ मोठे खड्डे पडले असून ते मुरूम टाकून धातूरमातूर पध्दतीने बुजवले. परंतु या मुरूमाची माती होवून धूळीचे प्रमाण वाढले असुन, या धुळीमुळे लहान मुले तसेच वयोवृध्दांचे आरोग्य बिघडले आहे .
करंजी ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर आठ दिवसांनी टँकरने पाणी टाकून उडणारी धूळ थोपवण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला, मुरूम नको डांबराने खड्डे बुजवा अशी मागणी केली आहे .
मेहेकरी ते पाथर्डी दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी साईडपट्या अनेक दिवसापासुन खोदून ठेवल्याने दररोज लहान मोठे अपघात या साईडपट्यांमुळे होत असुन अनेकजण जायबंदी होत आहेत.
महामार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. कारण ठेकेदारांवर लोकप्रतिनिधी व अधिकारी म्हणून कोणाचाही वचक राहिलेला नाही.
संमंधीत ठेकेदाराला लोकप्रतिनिधी का जाब विचारत नाहीत ? त्याला पाठीशी घालण्याचे काम कोण करतय व हे काम नेमकी कधी पुर्ण होणार आहे.
याचा जाब विचारण्यासाठी व कामाला गती मिळण्यासाठी पाथर्डी येथे लवकरच “आक्रोश आंदोलन “आपण हाती घेणार असल्याचा इशारा अॅड सतीश पालवे यांनी दिला आहे .
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved