अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्राला मारहाण करून मुलीवर सामूहिक बलात्कार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नागपूर मध्ये रनाळा-भिलगाव मार्गावरील एका फार्म हाऊसजवळ अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्राला मारहाण करून मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !

नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तीन विधिसंघर्षग्रस्त आरोपींना अटक केली असून पीडित मुलगी आणि तिच्या सहकाऱ्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे पण वाचा :- ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील

मंगळवारी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. पीडित मुलगी आणि तिचा साथीदार हे दोघेही अकरावीचे विद्यार्थी असून दोघे कळमना परिसरातील रहिवासी आहेत.

हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …

मंगळवारी सायंकाळी पीडित मुलीचा मित्र तिच्या घरी पुस्तक आणायला गेला होता. त्यानंतर दोघे रनाळा-भिलगाव मार्गावर फिरत असताना तेथे तिघांनी त्यांना गाठले.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : नालायक शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली सेक्सची मागणी !

दोघांना पट्ट्याने बेदम मारहाण केल्यानंतर त्यांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केले. ही घटना घडली त्यावेळी मुलीचा मित्र सातत्याने नराधमांना सोडून देण्याचे आर्जव करत होता.

हे पण वाचा :- जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार

या घटनेनंतर पीडित मुलगी व तिच्या मित्राने कुटुंबीयांच्या मदतीने कसेबसे कळमना पोलिस ठाणे गाठले. मात्र, घटनास्थळ कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यांना कामठी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले.

हे पण वाचा :- 5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी महिन्यात करून दाखवले !

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. तिघेही विधिसंघर्षग्रस्त आरोपी असल्याचे आढळून आले. यापूर्वी तिघांचा लुटमारीच्या अनेक घटनांमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment