पालकमंत्री हसन मुश्रीफ दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

Published on -

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- महाराष्‍ट्र राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

गुरूवार दि.30 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय निवासस्‍थान, मुंबई येथुन शासकीय मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालय,

अहमदनगर येथे आगमन व जिल्‍ह्यातील जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांच्‍या समवेत नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे कोरोना विषयक आढावा बैठक.

दुपारी 4 वाजता सन 2020-21 खरीप हंगाम आढावा बैठक, सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्‍काम.

शुक्रवार दि. 1 मे 2020 रोजी सकाळी 8 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे महाराष्‍ट्र दिनाच्‍या ध्‍वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. तद्नंतर लगेचच 8.30 वाजता शासकीय मोटारीने पूणे, सातारा, सांगली मार्गे कागल, कोल्‍हापुरकडे प्रयाण

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe