पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले…राज्याला आर्थिक त्रास देणारा ‘अर्थसंकल्प’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

नुकतेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रसरकारने महाराष्ट्राच्या वाट्याला अक्षता पुसण्याचे काम केले आहे.

केंद्र सरकारला महाराष्ट्र राज्याचे जीएसटीचे 38 हजार कोटी देणे आहे. मात्र एखाद्या विरोधी राज्याला आर्थिक त्रास असा द्यावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा अर्थसंकल्प आहे.

असा घणाघात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले कि, महाराष्ट्र राज्यावर फार मोठा अन्याय झाला आहे. केवळ मेट्रोसाठी आर्थिक तरतूद केली आहे.

तर दुसरीकडं भरघोस अशी तरतूद येणाऱ्या राज्यातील निवडणुकीसाठी केली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांसाठी भरपूर तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना निराश करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे.

गेल्या 65 दिवसांपासून दोन लाख शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत व्यवहार चुकीचा होत आहे. मात्र यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांवर देखील अन्याय करणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News