गुटखा विक्री तेजीत ; नागरिकांना पडलाय ‘हा’ प्रश्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाने गुटखा, तंबाखू, पानमसाला आदी तस्करी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे अनेक ठिकाणी हा व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मात्र जिल्ह्यातील एका तालुक्यात या पदार्थांवर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

श्रीगोंदा तालुक्यात गावोगाव पर्यंत पाळेमुळे रुजलेला गुटख्याच्या अवैध व्यवसाय अजूनही थांबवता आलेला नाही याच कारणामुळे शहरासह तालुक्यातील विविध गावांत गुटख्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

तालुक्यातील श्रीगोंदा आणि बेलवंडी या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी काम करत असले तरी अवैध व्यवसायात काही धंदे राजरोसपणे सुरू आहेत.

अवैध दारू विक्रीवर कारवाईसाठी तसेच गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. मात्र तालुक्यातील अवैध गुटख्याच्या धंद्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला फारसे यश आले नाही.

शहरासह तालुक्यातील विविध गावांत गुटख्याची पोहोच डिलेव्हरी दिली जात आहे. पान टपर्‍यावर राजरोस पणे गुटखा विक्री होत आहे.

या टपर्‍यांपर्यंत होलसेल दरात विक्रीस बंदी असलेला गुटखा पोहोच देणारी यंत्रणा काम करत आहे. या सर्वांवर कारवाई कधी होणार आणि हा तरुणाईला बरबाद करणारा अवैध धंदा बंद कधी होणार याबाबत चर्चा जनमानसात होऊ लागली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe