पुणे: महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाने जास्त धुमाकूळ घातला आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात सर्वाधिक नवे कोरोनाबधित आढळले.
३५८ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांचा आकडा आता ५ हजार 167 झाला आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता आणल्याबरोबर पुण्यात रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/05/Coronavirus-1.jpg)
दिवसभरात पुण्यात तब्बल 291 रुग्णांची वाढ झाली. 15 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी कोरोना बळींची संख्या 257 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित २ हजार 552 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर पुणे जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार 212 इतकी आहे. दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. 24 तासांत 6 हजारांहून अधिक नवे रुग्ण समोर आले आहेत.
त्यामुळे देशात सध्या 1 लाख 19 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 49 हजार 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 66 हजार 889 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 44 हजार 582 वर पोहोचला आहे. मुंबईत रुग्णवाढीचे दररोज नवे उच्चांक समोर येत आहेत. आज एका दिवसातली सर्वाधिक रुग्णवाढ मुंबईत पुन्हा दिसून आली.
1751 रुग्ण गेल्या 24 तासांत मुंबईत आढळले. शहरात कोरोनाव्हायरसमुळे 27 मृत्यू नोंदले गेले. मुंबईत कोरोनाव्हायरसचा धोका उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
ठाण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असून ठाण्यात आज 186 नवे रुग्ण आढळून आले. ठाणे महापालिका हद्दीतली ही मोठी वाढ आहे.