अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- अहमदनगरमधील कॅन्टोन्मेंट बोर्डातील कर्मचारी शिशिर पाटसकर याच्याविरोधात महिलेचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये मुलाला नोकरी लावतो, असे सांगून शिशिर पाटसकर याने महिलेचे शारीरिक शोषण केलं आहे.
फिर्यादी महिलेने म्हंटले आहे कि, शिशिर पाटसकर याने ‘तुमच्या मुलास कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर येथे नोकरीस लावतो’ असे म्हणून तो मला ऑफिसला बोलवत होता.
यानंतर २०१७ मध्ये नेवासा कोर्टात बोलावले. तिथे शिशिर याने मला बाजूला नेऊन बळजबरीने अतिप्रसंग केला. परंतु माझ्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न असल्याने मी झालेल्या घटनेची माहिती कोणाला दिली नाही.
२०१८ मध्ये पाटसकरने तुमच्या मुलाच्या नोकरीबाबत बोलायचं आहे. असे सांगून पीडितेला एमआयडीसी येथील हॉटेलवर बोलून घेतले, आणि बळजबरीने अतिप्रसंग केला.
यानंतर तू मला भेटत नाही. माझ्यासोबत चल नाहीतर मी आता गावभर तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. असे फिर्यादीने म्हंटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved