अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन अद्यापही सुरु आहे. दरम्यान या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा व आंदोनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहे.
नाशिक येथून किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू होणार्या या वाहन मोर्चात महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधून हजारो शेतकरी सहभागी होत आहेत.
हजारो वाहने असलेला हा वाहन मोर्चा मुंबई-आग्रा महामार्गाने ओझर, पिंपळगाव बसवंत, शिरवाडे (वणी) मार्गे सायंकाळी 5.30 वाजता चांदवड येथे मुक्कामी पोहचेल.
आज 22 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा चांदवड येथून वाहन मोर्चा पुन्हा सुरू होऊन उमराणे, मालेगांव, धुळे, शिरपूर मार्गे मध्यप्रदेशात मार्गस्थ होईल. तसेच मध्य प्रदेश, राजस्थानमार्गे 24 डिसेंबर रोजी मोर्चा दिल्ली येथे पोहचेल.
शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे या मागण्यांबरोबरच शेतकर्यांना आधार भावाचे कायदेशीर संरक्षण देणारा कायदा करावा व सरकारने
आधार भावाने शेतीमाल खरेदी करण्याची सक्षम व्यवस्था उभी करून अन्नदात्याला घामाचे रास्त दाम व भुकेलेल्याला रास्त दरात अन्न देण्याची कायदेशीर व्यवस्था उभी करावी या प्रमुख मागण्यांसाठी हा वाहन मोर्चा काढण्यात येत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com