अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठेस आज सकाळी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली पोलिस अधीक्षक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
दरम्यान रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तब्बल १०२ दिवसानंतर आरोपी बाळ बोठेस पोलिसांनी अटक केली आहे. इतक्या दिवस पोलिसांना गुंगारा देण्यात बाळ बोठे यशस्वी झाला होता.
बोठे याने उस्मानीया विद्यापिठातून (हैदराबाद) पदवी घेतलेली आहे.या दरम्यान वकील जनार्दन अतुले याच्याशी बोठेची उस्मानिया विद्यापिठात ओळख झाली होती. वकील अतुले ही गुन्हेगारांना आश्रय देणारी व्यक्ती म्हणून हैद्राबादमध्ये परिचित आहे.
हैद्राबादमध्ये वास्तव्य करताना तसेच फरार असताना बोठे याने सन २०१८ मध्ये एका कुख्यात गुंडाने वापलेला मोबाईल नंबर वापरला होता. पसार झाल्यानंतर बोठे याने त्याची ओळख लपवण्याचाही प्रयत्न केला.
रेखा जरे यांनी तक्रार केली तर बदमानी होईल, गुन्हा दाखल होईल या भितीने बोठे याने जरे यांचा काटा काढल्याची माहीतीही पोलिस अधिक्षक पाटील यांनी दिली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|