हेल्मेट घरी विसरलाय ,सावधान .बातमी वाचून तुम्हीही घ्याल काळजी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- स्वतःच्या जीवाला काडीची किंमत न देता बेफिकीरीने गाडी चालवणाऱ्यांना लगाम घालावा लागणार आहे . झालायचं असं काही कि २०१८ च्या तुलनेत २०१९ वर्षांमध्ये रस्त्यावरील अपघातात वाढ झालीय .

देशात सगळ्यात जास्त मृत्यू होणाऱ्या राज्यांमध्ये महारष्ट्र सर्वात वर आहे . हेल्मेट आणि सिटबेल्टशिवाय महाराष्ट्रात जवळपास ७००० हजारांवर लोक मृत्यूमुखी पडले आहेत .

२०१९ वर्षात हेल्मेट न घातल्यामुळे ५ हजार ३२८ लोकांचा मृत्यू झाल्याचं महाराष्ट्र महामार्ग पोलिसांकडून कळवण्यात आलाय . हेल्मेट न घातल्याने गंभीर जखमी झालेल्या लोकांची संख्याही ६ हजार ४२७ च्या घरात पोहोचलीय .

दरवर्षी निष्काळजीपणामुळे मृत्यूमुखी पडणारे आणि गंभीर जखमी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे . सुरक्षित साधने न वापरल्यामुळे जवळपास १०% अपघात होतात .

हेल्मेट न घातलेल्या चालकामुळे १ हजार ६४६ सहप्रवासी मृत पावले असून ३ हजार ६८२ चालकांनाही आपला बळी गमवावा लागलाय .

सीटबेल्ट न घातल्याने जवळपास ८१९ चालक आणि ८७६ प्रवासी मृत पावलेत . यावरून असं दिसून येत कि चालकापेक्षा त्याच्या सोबतच्या प्रवाशांनाच आपला जीव नाहक गमवावा लागलाय .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment