अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.
तनपुरे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असताना देखील ते आपलं कर्तव्य बजावत असल्याच पाहायला मिळत आहे. आजारी असताना देखील मंत्री तनपुरे हे राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात अंतिम परीक्षा होणार असून त्यादृष्टीने राज्यातील कुलगुरुंच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता सोप्या पध्दतीने व सुरक्षित वातावरणात परीक्षा कशा देता येईल,याचे नियोजन तेे करत आहेत.
मंत्री तनपुरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना परीक्षेची तयारी चालू ठेवण्याचे आवाहन केले. परीक्षा सोप्या पध्दतीने कशी घेता येईल यासाठी सातत्याने कुलगुरुंशी संवाद साधून मार्ग काढत आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved