अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने नगरकरांना चांगलाच घाम फुटला होता. यासंकटमय काळात अनेक कोरोना योध्याने जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरूच ठेवले.
रुग्णांची सेवा करताना काहींना आपले प्राण देखील त्यागावे लागले. कुटुंब निराधार झाले मात्र याच कोरोना योध्यांचे कुटुंबीय आज आर्थिक मदतीविना संकटात सापडले आहे.
कोरोनामुळे महापालिकेतील तीन कर्मचार्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना सरकारने 50 लाखांची मदत जाहीर केली आहे. मात्र या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना अद्याप मदत मिळालेली नाही.
त्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना मदत मिळून द्यावी, अशी मागणी अधिकारी व कर्मचारी समन्वय समितीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली आहे.
भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की करोना महामारीमुळे मनपाचे तीन कर्मचारी दगावले आहेत. शासनाने करोना काळात कर्मचारी मयत झाल्यास 50 लाखांची मदत जाहीर केलीली आहे.
परंतु अद्यापपर्यंत आपल्या मयत सहकारी कर्मचार्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली नाही. राज्यात अनेक ‘ड’ वर्ग महापालिकेतील कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे.
आपल्या महापालिकेत अद्यापपर्यंत सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही. अशा अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved