गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

शिवाय, संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. ”आज माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.

तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी करोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.

” असं अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेल्या नऊ महिन्यात पोलीस खात्यातील भरपूर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.

या कठीण काळात राज्याचे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख स्वत: विविध ठिकाणी जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना धीर देत होते. कोरोना काळात त्यांनी पोलिसांची जबाबादारी खांद्यावर घेतली.

आवश्यक तिथे पोलिसांची बाजू घेतली. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांच्या कामांचं देखील तोंडभरुन कौतुकही केलं. पोलिसांप्रती असणारा अभिमान त्यांच्या बोलण्यातून कायम जाणवतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment