अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलिस प्रशासनाने निर्माण करावा.
तसेच कोरोनाचे निर्बंध व नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बाेलत होते.
या बैठकीला अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) आनंद लिमये, प्रधान सचिव विनीत अग्रवाल,
मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.
कोरोनाच्या लढाईत पोलिस विभाग अहोरात्र कार्यरत आहे. पोलिसांनी मनोधैर्य खचू न देता कर्तव्य बजावावे, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास गृहमंत्र्यांनी यावेळी पोलिस यंत्रणेला दिला आहे.
तसेच जनतेने कोरोनाच्या या लढाईमध्ये सरकार तसेच पोलिस प्रशासनास सहकार्य करून करोनाच्या त्रिसूत्रीचे म्हणजे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे यांचे पालन करावे, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.
राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. हे सर्व निर्बंध कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले आहेत.
नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलिस प्रशासनाने निर्माण करावा.
तसेच अधिकारांचा वापर संवेदनाशीलपणे करण्याचे निर्देश देतानाच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी दिल्या.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|