अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये उपचार सुरु असलेल्या एक वर्षीय कोरोनाग्रस्त मुलीचा वाढदिवस येथील डॉक्टरांच्या मदतीने वैद्यकीय काळजी घेऊन रुग्णालयातच साजरा करण्यात आला.
यावेळी केक कापताना तिच्या आईवडिलांनी व डॉक्टरांनी पीपीई किट्स परिधान केले होते. आई वडिलांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न पहिले होते.
परंतु मुलीला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना दवाखान्यातच वाढदिवस साजरा करावा लागला. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे एक कोरोनाग्रस्त दाम्पत्य दाखल झाले
असून त्यांच्या एका वर्षाच्या मुलीला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आज या मुलीचा पहिला वाढदिवस होता व आज तिचे आई वडील तिच्याजवळ असूनही हा वाढदिवस साजरा करू शकत नव्हते.
म्हणूनच तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या डॉक्टरांनी या कुटुंबाची ही इच्छा पूर्ण केली.तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केक आणून या मुलीचा वाढदिवस साजरा केला.
कोरोनाच्या संकटात आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केल्यामुळे या दाम्पत्याने तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमधील डॉक्टरांचे आभार मानले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com