हुंडेकरी अपहरण प्रकरण : आरोपींकडून धक्कादायक खुलासे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- शहरातील उद्योजक,व्यावसायिक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना परतूर (जालना) येथे अटक केली. दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार हुंडेकरी यांचे अपहरण २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी करण्यात आले होते. मात्र या कटाचा सुत्रधार शहरातील कुख्यात गुन्हेगार अजहर मंजूर शेख व त्याचा जोडीदार मात्र पोलिसांच्या सापळ्यातून पसार झाले. अजहर शेख याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.

वैभव विष्णू सातोनकर व निहाल मुशरफ शेख उर्फ बाबा ( दोघे रा . परतूर,जालना ) या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांनी खंडणीसाठी हुंडेकरी यांचे अपहरण केल्याची कबुली दिली आहे. अपहरणासाठी वापरलेली कार ( एमएच २० ईजे ३८७९) पोलिसांनी जप्त करून परतूर पोलिसांकडे ठेवली आहे.

कटाचा सूत्रधार अजहर मंजूर शेख असल्याची माहिती पोलिसांना लगेच मिळाली होती. हुंडेकरी यांनी त्याच्या विरोधात पोलिसांना एका घटनेत मदत केली त्याचा राग अजहरच्या डोक्यात आहे. त्यातून व पैशांची गरज असल्यातून त्याने हुंडेकरी यांच्या अपहरणाचा कट रचल्याचे समजले. अजहरचे परतूरमध्ये घर आहे. त्याचा फायदा त्याने घेत तेथेही चांगलेच बस्तान बसवले आहे. हुंडेकरी यांना जालना येथे सोडल्यानंतर अहिर परतूरला गेला. समवेत गुन्ह्यात मदत करणारे साथीदारही होते.

स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना परतूर येथून अटक केली. परंतु ज्याच्या भूलथापांना बळी पडून हा गुन्हा केला तो मास्टरमाईंड अजहर मात्र पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार झाला.

सराईत गुन्हेगार अजहर मंजूर शेख याच्या भूलथापांना ते बळी पडले अन् अपहरणाच्या गुन्ह्यात अडकले. नगरला जायचे सांगत अजहरने त्यांना जालना जिल्ह्यातील परतूर येथून बरोबर घेतले. नगरला आल्यावर एकाचे अपहरण करण्यास सांगितले. आतापर्यंत एकाही गुन्ह्यात नाव नसलेले हे दोघे आता अपहरणाच्या गुन्ह्यात अडकले आहेत.

उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणात अटकेत असलेल्या दोघा आरोपींची ही कहाणी आहे.
हुंडेकरीप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी परतूर येथे छापा टाकून दोघांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, हे दोघेही सराईत गुन्हेगार नाहीत. एकजण अल्पवयीन असून तो बारावीत आहे. दुसरा आरोपी निहाल ऊर्फ बाबा मुशरफ शेख (लढ्ढा कॉलनी, ता. परतूर) हा विशीतला तरुण आहे.
 दोघांची चार महिन्यांपूर्वीच परतूर येथील एका जीममध्ये ओळख झाली. त्यानंतर दोघे अजहरच्या संपर्कात आले. नगरला जायचे आहे, असे सांगत अजहरने दोघांसह आणखी एकाला नगरला आणले. नगरला आल्यानंतर अपहरणाचा प्लॅन त्यांच्यासमोर ठेवला. मोठ्या उद्योजकाचे अपहरण करायचे आहे, हे समजताच त्यांनी अजहरच्या हो ला हो मिळवली अन् सोमवारी पहाटे उद्योजक हुंडेकरी यांचे अपहरण केले.

अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात पाठण्याचे आदेश देण्यातच आले आहेत. अल्पवयीन आरोपी एसटी बसवाहकाचा मुलगा असून बारावी शिकलेला आहे. जीममध्ये एकाशी झालेली मैत्री त्याला अपहरणाच्या गुन्ह्यापर्यंत घेऊन गेली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment