पराभव झाल्याने तुफान राडा; तिघेजण जखमी या आमदाराच्या तालुक्यात घडला प्रकार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- काल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत पराभव झाल्याने वाद झाला. यात १० ते १२ जणांनी केलेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत.

ही घटना पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथे मतमोजणीच्या दिवशीच म्हणजे दि.१८ रोजी दुपारी २ वाजता समाजमंदिरासमोरील चौकात घडली. या  मारहाणीत शिवाजी विलास काळे, ऋषिकेश मधुकर काळे व राहुल सावळेराम आमले (सर्व रा.अस्तगाव ता.पारनेर) हे जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर असे की, ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवाराच्या पराभव झाल्याच्या कारणावरून कैलास मच्छद्रिं काळे, संकेत दादाभाऊ काळे, तुषार दादाभाऊ काळे, अनिकेत राजेंद्र काळे, संकेत रा काळे, विवेक उत्तम काळे, अविनाश अरुण काळे, विशाल उत्तम काळे, रंगनाथ साहेबराव काळे ,

निवृत्ती साहेबराव काळे , जालिंदर सदाशिव काळे, सागर रावसाहेब काळे (सर्व रा.अस्तगाव ता.पारनेर) यांनी वरील तिघांना लोखंडी धारदार वस्तु, लाकडी दांडके व दगडाने मारहाण करून फिर्यादीचे चुलत भाऊ सुहास काळे याचे टोयाटा कंपनीची लिवा गाडी (नं एमएच १२ आरएफ ८१४९) वर दगड मारून गाडीची समोरील व पाठीमागील काच व ब्रेकलाईट फोडून नुकसान केले तसेच जिल्हाधिकाऱ्याच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबाबतचा सुपा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रविराज विलास काळे याने फिर्याद दिली आहे. घटनास्थळाला पोलिस उपअधिक्षक सोनवणे मॅडम, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, पोहेकॉ एस.एन. कुटे यांनी भेट देऊन माहिती घेतली . घटनेचा पुढील तपास  पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे याच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe