अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- शेतकरी व निराधार तळागाळातील कष्टकरी माणूस हा माझा श्वास आहे. त्यांच्या जीवावरच मी आमदार झालो.
त्यामुळे मतदारसंघातल्या सर्व वंचित निराधारांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून देईन.मतदार संघातील इतर विकासकामे करत असताना या योजनेला मी प्रथम प्राधान्य देईल असे मत आमदार लंके यांनी व्यक्त केले.
गावातील निराधारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी गावातील सुमारे ७० वंचित लाभार्थ्यांना जागेवरच उत्पन्नाचे दाखले व रेशन कार्ड वितरित केले.
त्यामुळे त्यांना दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणी मांडल्या त्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन आमदार लंके यांनी यावेळी दिले.
यापुढे कामरगाव मधील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश कामगार तलाठी पांडुरंग कोतकर यांना दिले. उत्पन्नाचे दाखले जागेवरच दिल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved