मी पित नाही बिडी…..मग मला कशाला लागेल इडी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-आपल्या अनोख्या कवितांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे नेहेमीच चर्चेत असतात. तसेच कोरोनाच्या काळातही त्यांच्या घोषणेमुळे ते चांगलेच चर्चेत राहिले होते.

नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यांनी केलेल्या ट्विटला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही काव्यओळीतूनच उत्तर दिले आहे. आपण बिडी पित नाही, त्यामुळे आपल्या इडीची भीती वाटत नाही, अशी मिश्कील कविता आठवले यांनी केली.

ते काल शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. नोटीस आल्याची बातमी आल्यानंतर राऊत यांनी केलेल्या ट्विटची चर्चा झाली. आ देखे जरा किसमे कितना हे दम, असे ट्विट राऊत यांनी केले होते.

त्याला उत्तर देताना आठवले म्हणाले किसमे कितना हैं दम, तो हम भी नही कुछ कम, असा टोला आठवले यांनी लगावला आहे. ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे. ती पक्ष पाहून काम करीत नाही.

ईडीला माहिती देणारे अनेक जण असू शकतात. अंजली दमानिया यांनीही एकनाथ खडसे यांच्यासंबंधी अनेक तक्रारी केल्या आहेत. खडसे यांनी पक्षांतर करायला नको होते. अर्थात त्यांनी पक्षांतर केले म्हणून इडी कारवाई करीत आहे, असेही नाही असे आठवले म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe