‘नगर’ शहरातून भाजपचा आमदार निवडून द्यायचाय; विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीची तयारी करा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तसे मोठे आहे. राज्यातील निवडक जिल्हे असे आहेत कि जेथे सत्ता असावी असे प्रत्येक पक्षाची इच्छा असते.

यापैकीच एक म्हणजे अहमदनगर जिल्हा. जिल्ह्यातील नगर शहरावर अनेक पक्षांचा राजकीय डोळा असतो. आता भाजपनेही असाच एक आशावाद व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पक्षाला येणारे दिवस फार चांगले आहेत. नगर शहरात भाजपाने नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, खासदार, राज्य व केंद्रीय मंत्री आदी लोकप्रतिनिधी दिले आहेत.

मात्र शहराचा आमदार अद्याप भाजपचा झालेला नाही. नगर शहरातून भाजपचा आमदार निवडून द्यायचाय, आता विधानसभेची मध्यवर्ती निवडणुकही लवकरच होणार असल्याने त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले.

शहर भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा सोमवारी सायंकाळी एका संस्थेने सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे म्हणाले, शहर भाजपची कार्यकारणी निवडतांना सर्वांशी सल्लामसलत करून प्रत्तेक घटकाला कार्यकारणीत स्थान दिले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment