अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘कडकनाथ कोंबडी प्रकरणात माझ्या अथवा कुटुंबीयांच्या विरोधातील पुरावे राजू शेट्टी यांनी द्यावेत. आरोप सिद्ध झाल्यास आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ,’ असे आव्हान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांना दिले आहे.
पराभव झाल्यापासून राजू शेट्टी वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवे होते, ते मिळाले नसल्याने ते आंदोलन करत सुटले आहेत.
शेतकऱ्यांची दिशाभूल करून आंदोलन सुरू करायचे आणि आंदोलन उभे राहिले की स्वत: तडजोड करून शेतकऱ्यांचा पोशिंदा असल्याचा आव आणायचा. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी सदाभाऊंना लक्ष्य करून आंदोलन करण्याचे धंदे राजू शेट्टीनी बंद करावेत, अशी टीकाही खोत यांनी केली.