अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : विधान परिषदेसाठी शरद पवार यांनी संधी दिली, तर मी त्या संधीचे सोने करून दाखवेन. माझ्या आयुष्यातील तो टर्निंग पॉइंट असेल, असे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सलगर यांनी आमदार नीलेश लंके यांच्या कार्यालयास भेट दिली. सत्कारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधान परिषदेत पाठवण्यात येणाऱ्या सदस्यांसंदर्भात सलगर यांच्या नावाची चर्चा आहे.
त्याविषयी छेडले असता ही संधी मिळाली, तर तिचे सोने करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थापन केलेल्या युवती काँग्रेसची मी स्थापनेपासूनची सदस्य आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या मी सक्षमपणे पार पाडल्या.
या वेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे, युवतीच्या तालुकाध्यक्ष पूनम मुंगसे, पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, राजेंद्र चौधरी, बापू शिर्के यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews