अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- ममता बॅनर्जी यांच्यापाठीशी जसे त्यांच्या राज्यातील खासदार उभे राहू शकतात तसे पवारसाहेबांच्या पाठी राज्यातील ४८ खासदार का उभे राहू शकत नाहीत असा प्रश्न उपस्थित करतानाच तसा महाराष्ट्र आजही साहेबांच्या पाठिशी उभा आहे
परंतु महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तर तो दिवस दूर नाही जे स्वप्न आपण पहात आहोत ते पूर्ण करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
मला ४० वर्षे पवारसाहेबांना जवळून पाहण्याचा सौभाग्य लाभलं… मला घडवण्यामध्ये आणि मी जो काही आहे तो पवारसाहेबांमुळे अशी प्रामाणिक कबुली खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.
३० वर्षात राष्ट्रीय राजकारणात पवार साहेबांच्यासोबत आहे. मानसन्मान आज आहे तेवढाच मानसन्मान त्याकाळातही होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जेव्हा जेव्हा दिल्लीला येत होते.
तेव्हा फक्त आणि फक्त पवारसाहेबांकडे येत होते असे सांगताना समाजकारणात साहेबांनी कधी राजकारण केले नाही हेही खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com