अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-महाराष्ट्र शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचे राज्यातील जनतेने स्वागत केले.
नागरिकांनी शक्य झाल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीत लसीची रक्कम दान करा, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. तांबे म्हणाले, महाविकास आघाडीने कोरोना लढ्यात महत्त्वपूर्ण काम केले.
नव्याने १८-४४ वयोगटाच्या नागरिकांचे मोफत लसीकरणाचा घेतलेला निर्णय अत्यंत चांगला असून सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. राज्यात कोरोनाचे मोठे संकट आहे. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यात राजकारण होत आहे.
या सर्व परिस्थितीवर सरकार सक्षमपणे मार्ग काढत आहे. ऑक्सिजन बरोबरच रुग्ण संख्या कमी करणे आव्हान आहे. यासाठी नियम पाळा. लक्षणे आढळल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या. निष्काळजीपणा करू नका.
आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित. हा संकट काळ आहे. सुरक्षितता हेच प्रभावी शस्त्र आहे. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|