काल जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकानां जबरी धक्का बसला आहे.हा निकाल अविश्वसनीय असल्याचे काही लोक बोलत आहेत.
मोदी तसेच भाजपच्या ह्या निकालानंतर तर तुम्ही निराश असाल तर आम्ही सांगणार आहोत ह्यातून बाहेर पडण्याचे पाच सोपे मार्ग, या टिप्समुळे आपल्याला तणावमुक्त राहण्यास मदत होईल. तसेच आपले आरोग्य निरोगी राहण्यासही मदत होईल.
१) डान्स करा
डान्स हा मानवी आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. कोणत्याही प्रकारचा तणाव डान्स दूर करतो.निकालामुळे तुम्ही निराश असल्यास, आपल्या आवडत्या गाण्यावर डांस करा, असे केल्याने नैराश्य व तणावातून मुक्तता मिळवू शकते. हा तणावापासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. असे केल्याने आपली मनःस्थिती खराब होणार नाही, तसेच तुमचा तणाव कमी होण्यास मदत होईल.
२) आवडती गाणी ऐका!
संशोधनातुन असे सिद्ध झाले आहे की, संगीत ऐकल्यामुळे मुळे व्यक्तीचा ब्लड़ प्रेशर कमी होतो. आणि त्याची हृदयाची गति सामान्य होते. त्यामुळे तणावातून दूर राहण्यास मदत होते.संगीत तुमच्यावरील मानसिक आणि शारिरीक ताण कमी करण्यास मदत करण्यास मदत करतात.म्हणूनच निकालानंतर जर तुम्ही तणावात असाल तेव्हा आपली आपल्या आवडती गाणे ऐकन्यास सुरुवात करा.
३ ) मन शांतीसाठी ध्यान,योगा करा
योग हे एक असे प्राचीन तंत्र आहे जे शरिर आणि मन दोन्हीवर काम करते आणि धक्क्यातून सावरण्यासाठी खूपच परिणामकारक आहे.अगदी श्वास घेणे आणि श्वास सोडणे ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ध्यान करू शकता हे करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची सर्व लक्ष फक्त स्वताच्या श्वासावर केंद्रित करायचे,मनात इतर विचार येवून द्यायचे नाहीत.
४) अधिक विचार करणे टाळा
जे व्हायचं होत ते झालय,देशाने मोदींना बहुमत दिलय,आता यावर विचार करून काहीच फायदा नाहीय, लक्षात ठेवा अती विचार करत असताना व्यक्तीचे मन योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम नसते. त्यामुळे तो अनेक मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेला असतो, त्याचे मन अनेक विचारांत गुंतलेले असते. त्यामुळे आपण आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत आपले विचार स्पष्टपणे मांडून मनाचा भार कमी करा. तसेच शक्य तितका कमी विचार करण्याचा प्रयत्न करा.
५) मित्रांबरोबर वेळ घालवा
काही लोक जेव्हा तणावग्रस्त असतात तेव्हा ते एकटे राहणे पसंत करतात. परंतु असे करणे मानसिक आरोग्यास हानिकारक ठरते. त्यामुळे तणावाच्या वेळी एकटे राहण्याऐवजी आपल्या कुटुंब किंवा मित्रांसोबत वेळ घालवा. यामुळे विचारांची देवाण- घेवाण होऊन आपल्याला हलके वाटण्यास मदत होईल. त्यामुळे आपण तणावापासून दूर राहाल.
६) बाहेर फिरायला जा
तणावात असाल तर आपण वातावरण बदलून ताण कमी करू शकता. बॅग पॅक करा आणि आपल्या आवडत्या शहराला किंवा पर्यटन स्थळाला भेट द्या. ज्यामुळे वातावरणात बदल होण्यास मदत होईल आणि बदलत्या हवामानात आपली मनःस्थितीत सकारात्मक राहील.
७) पूर्ण झोप घ्या
सुदृढ आरोग्यासाठी चांगली आणि गाढ झोप घेणे गरजेचे आहे. कमी झोपेमुळे हृदय, मेंदू आणि वजनावर अनेक प्रकारचे विपरीत परिणाम होतात.पुरेशी झोप न घेतल्यामुळे संपूर्ण शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. जगभरातील अनेक संशोधनात सुदृढ आरोग्यासाठी शांत आणि पुरेशा झोपेची आवश्यकता असल्याचे सिद्ध झाले आहे. ,त्यामुळे दररोज किमान सात ते आठ तासांची गाढ झोप घेणे आवश्यक असते.