वेळ नेहमी सारखीच राहत नसते आपल्या या आयुष्यात बर्याच चढ-उतार येतात, म्हणून, आपल्याला जे काही हवे असेल त्यावर विश्वास ठेवायला हवा आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगला पाहिजे.
अनेकदा आपल्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालू असताना अचानक काही घटना घडतात,आपण अस्वस्थ होतो, थांबतो, काहीच आपल्याला करावस वाटत नाही,खरतर हीच खरी आयुष्याची परीक्षा असते
कारण हीच वाईट दिवसांत आपण स्वताला कसे मजबूत ठेवतो यावरही बर्य्याच गोष्टी अवलंबून असतात,खडतर काळातही आपण कोणत्याही मदतीशिवाय स्वत: ला मजबूत ठेवू शकता.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा १० छोट्या गोष्टी ज्या केल्यानंतर तुम्ही तुमचे अस्वस्थ मन जागेवर आणू शकता,चला तर मग पाहूयात या १० गोष्टी ज्या खडतर काळात तुम्ही केल्यात तुमचा मूड फ्रेश होईल..


१) रोज सकाळी लवकर उठा,व्यायाम करा
नेहमी सकाळी लवकर उठा, शक्य असल्यास मोकळ्या हवेत वा निसर्गात फिरा, लक्षात ठेवा तुमची सकाळ सकारात्मक ठेवली तर तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल,सकाळच्या वेळेत मोकळ्या हवेत फिरल्याने तुमचा मूड फ्रेश होईल.

२) मन शांतीसाठी ध्यान,योगा करा
योग हे एक असे प्राचीन तंत्र आहे जे शरिर आणि मन दोन्हीवर काम करते आणि धक्क्यातून सावरण्यासाठी खूपच परिणामकारक आहे.अगदी श्वास घेणे आणि श्वास सोडणे ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ध्यान करू शकता हे करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची सर्व लक्ष फक्त स्वताच्या श्वासावर केंद्रित करायचे,मनात इतर विचार येवून द्यायचे नाहीत.

३) नातेवाईक,जुने मित्र यांच्याशी बोला.
एकांत माणसाला संपवू शकतो,जेव्हा डिप्रेशन मधे जातो वा आपल्या मना प्रमाणे गोष्टी घडत नाहित तेव्हा आपण समाजाशी संवाद तोडतो,पण हे अत्यंत घातक असते,आयुष्यातील समस्या आपण आपल्या व्यक्तीसोबत शेअर करायलाच हव्यात,आपले नातेवाईक मित्र यांच्याशी बोलून आपण आपले मन मोकळे करायला हवे.

४) थंड पाण्याने अंघोळ करा
थंड पाण्याने अंघोळ केल्याने आपल्या कितीतरी सवयींमध्ये सुधार होऊ शकतो. यामध्ये काही मुख्य फायदे देखील आहेत, जसे – रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होणे, तणाव कमी होणे, उत्साह आणि जागरूकतेमध्ये वाढ होते, कोल्ड शॉवर घेतल्याने तुम्हाला त्या परिस्थितींशी लढण्यासाठी प्रेरणा मिळते आणि तुम्ही घाबरत असलेल्या परिस्थितींशी लढण्यासाठी वेगळे मार्ग शोधण्यास मदत होते.रिसर्चनुसार थंड पाण्याने अंघोळ केल्यास आपण तणावमुक्त राहण्यास मदत होते आणि आपण निरोगी देखील राहू शकतो.

५) आवडीचे संगीत एका
संगीत तुमच्यावरील मानसिक आणि शारिरीक ताण कमी करण्यास मदत करण्यास मदत करतात. तुमच्यावरील ताण कमी झाल्याने प्रोडक्टटीव्हिटी सुधारते. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते तसेच अनेक आजारांपासून तुमचे रक्षण होण्यास मदत होते.

६) पूर्ण झोप घ्या
सुदृढ आरोग्यासाठी चांगली आणि गाढ झोप घेणे गरजेचे आहे. कमी झोपेमुळे हृदय, मेंदू आणि वजनावर अनेक प्रकारचे विपरीत परिणाम होतात.पुरेशी झोप न घेतल्यामुळे संपूर्ण शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. जगभरातील अनेक संशोधनात सुदृढ आरोग्यासाठी शांत आणि पुरेशा झोपेची आवश्यकता असल्याचे सिद्ध झाले आहे. जर दररोज पुरेशी झोप होत नसेल, तर आपल्यासाठी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते,त्यामुळे दररोज किमान सात ते आठ तासांची गाढ झोप घेणे आवश्यक असते.

७) मनापासून रडा
ज्याप्रमाणे हसणे आपल्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर असते तसेच कधी कधी रडणेही उपयुक्त ठरते. एका संशोधनानुसार, कधीतरही रडणे शरीरासाठी फायदेशीर असते, दुःख आपल्या मध्ये दडवुन ठेवल्याने ते वाढते. अशात एक एखाद्यासोबत हे दुःख वाटले तर मन हल्के होते. यामुळे जीवनात पुढे जाण्याची संधी मिळते.त्याच प्रमाणे रडल्याने तणाव कमी करण्यात मदत मिळते.

८) आवडती पुस्तके वाचा
पुस्तके वाचण्याचे अनेक फायदे आहेत, पण एकाच वाक्यात सांगायचे झाल्यास, महात्मा फुलेंचे एक प्रसिद्ध वाक्य या साठी पुरेसे आहे. ते म्हणजे,. “वाचाल तर वाचाल” वाचनामुळे मेंदुला चालना मिळते नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते.एक चांगले पुस्तक एक उत्तम मित्र असू शकते आणि ते आपल्या जीवनात यशस्वी बनवू शकते.

९) मनसोक्त शॉपिंग करा
शॉपिंग केल्याने तुमचा तणाव कमी होवू शकतो,कारण आवडत्या वस्तू,कपडे घेतल्याने तुम्ही त्या गोष्टी ट्राय करता,त्यांच्या बाबत विचार करता या दरम्यान तुम्हाला तुमचे प्रोब्लेम्स थोडा वेळ का होईना विसरता,त्यामुळे शॉपिंग करणे फायद्याचे ठरेल

१०) लॉंगड्राईव्ह ला जा,घराबाहेर पडून बाहेर फिरा
अपयश आल्यास बर्याचदा आपण स्वताला घरात कोंडून ठेवतो,बाहेर फिरत नाही,तुम्हाला ह्या जरा तणावातून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही पहिल्यांदा घरा बाहेर पडा शक्य असल्यास लॉंगड्राईव्हला,दूर अनोख्या ठिकाणी ट्रीप करा,निसर्ग सौंदर्य अनुभवा.