गैरकायदेशीररित्या घातक शस्त्रांची ऑनलाइन विक्री !

Ahmednagarlive24
Published:

यवतमाळ : घातक शस्त्रांची ऑनलाईन विक्री गैरकायदेशीररित्या केली जात आहे. ३० दिवसात तब्बल ११०४ शस्त्रांची विक्री करण्यात आली असून, याविरोधात युथ काँग्रेसने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे.

युथ काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ललीत जैन हे आपल्या सोशलमिडीयाचे अकाऊंट वापरत असताना त्यांना एका ऑनलाईन कंपनीद्वारे काही गैरकायदेशी शस्त्रांची यादी जाहीरात स्वरुपात प्रसिद्घ करण्यात आल्याचे दिसले. त्यामध्ये मॉडेल नं. आर. ई. १ शस्त्राची विस्तृत माहिती उपलब्ध होती.

तसेच त्याची किमत ८७९ रुपये दर्शविण्यात आलेली दिसली. हे शस्त्र जवळपास ९ इंचाचे आहे. अशा घातक शस्त्राची जाहीरात आणि ते एवढे सहज उपलब्ध होणे ही गंभीर बाब आहे. एवढे सहज शस्त्र उपलब्ध झाल्याने ते बाळगण्याची ‘के्रझ’ अल्पवयीन मुलांमध्ये वाढली आहे.

यवतमाळ शहर क्राईमध्ये महाराष्ट्रात अव्वलस्थानी आहे. अशास्थितीत कंपनीने ३० दिवसात एवढे घातक शस्त्र ११०४ एवढ्या मोठ्या संख्येने ऑनलाईन विकलेले आहे.

यावरून याप्रकरणाची गंभीरता ओळखता येते. विशेष बाब म्हणजे कंपनी शस्त्र विक्री करताना कुणाला, कशासाठी याबाबतचे प्रश्न न विचारता व्यवसायावर भर देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment