शेतजमीन व दुचाकी, चारचाकी असलेल्यांना आता रेशनचे धान्य मिळणार नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- अपात्र शिधापत्रिकांची शोधमोहीम शासनाने सुरू केली आहे. दुचाकी, तसेच चारचाकी वाहन नावावर असलेल्या शिधापत्रिकाधारकांना आता धान्याचा लाभ मिळणार नाही.

शेतजमीन नावावर असलेल्यांनाही रेशनच्या धान्यास मुकावे लागण्याची शक्यता आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे,

केंद्र शासनाकडून आलेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत.

सध्या अपात्र शिधापत्रिकाधारकांनाही धान्याचा लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरवण्यासाठी निश्चित केलेल्या निकषांतर्गत

अंत्योदय बीपीएल प्राधान्य कुटुंब लाभार्थी घटक म्हणून अर्जदाराने सादर केलेल्या माहितीची योग्य छाननी व खात्री करुनच शिधापत्रिकाधारकांची पात्रता निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.

दुचाकी, चारचाकी व जमिनीच्या मालकीबाबत प्रादेशिक परिवहन, तसेच महसूल विभागाशी समन्वय ठेवून शिधापत्रिकाधारकांच्या कागदपत्रांची छाननी करावी,

असे लोकलेखा समितीने आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार कार्यवाही झाली, तर अनेक शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

शासनाने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांच्या शिधापत्रिका अपात्र करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच स्वस्त धान्य दुकानदारांवरदेखील बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

अगोदरच तुटपुंज्या कमिशनवर दुकानदार कशीबशी गुजराण करत आहेत. दुकानदारांना क्विंटलमागे कमिशन दिले जाते.

अशा पध्दतीने शिधापत्रिका अपात्र ठरवल्या, तर दुकानदारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

त्यामुळे अतिशय अल्प प्रमाणात धान्याचा कोटा मिळेल. कारण प्रत्येक गावात फार थोडेच लाभार्थी शिल्लक राहतील. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment